महापालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद : 200 गणेशभक्तांनी तयार केल्या शाडू पासून गणेश मूर्ती
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून हरित गणेशोत्सव 2023 आणि माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न झाली. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील तसेच उपआयुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार आमराई मध्ये पार पडलेल्या कार्यशाळेत एक हजारो अधिक गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता.
सकाळी नऊ ते बारा या वेळेत शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आमराई मध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शाडू पासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला.या कार्यशाळेत एक हजारहुन अधिक गणेशभक्त यामध्ये सहभागी झाले होते. महापालिकेकडून प्रत्येकाला शाडूची माती गणेशमूर्ती तयार करण्यासाठी देण्यात आली होती.
या कार्यशाळेमध्ये साधारणतः 200 हून अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या. या पर्यावरण गणेशमूर्ती गणेश भक्तांनी आपापल्या घरी प्रतिष्ठापित करण्याचा निर्धार करत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचा निश्चय केला. वंदना सेवलकर यांनी सर्वांना शाडू पासून गणेशमूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे , स्वच्छ सर्वेक्षण व माजी वसुंधरा अभियानाचे दीपक चव्हाण , शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण , वैष्णवी कुंभार प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे , उद्यान अधीक्षक गिरीश पाठक , शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी गीता शेंडगे कार्यशाळा प्रमुख तेजस शहा , वृषाली अभ्यंकर, सिद्धिक पठाण, शिवम शिंदे, ऋषिकेश डूबल यांच्यासह महापालिकेचे बागा विभाग आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)