चंद्राबाबूनंतर आता साऊथ च्या एका बड्या अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक, काय आहे कारण....
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना काल भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता साऊथच्या एका अभिनेत्याला अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. साऊथचा प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण हा आता एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याला काही करुन चंद्राबाबूला भेटायला आंध्रमध्ये जायचे होते. मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यानं त्यानं रस्त्यावर उतरुन त्या घटनेचा निषेध नोंदवला होता. आता पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगितले जात आहे. पवन कल्याण हा साऊथचा प्रचंड लोकप्रिय असणारा अभिनेता असून त्याच्या अटकेनं चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.
तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्राबाबू यांना भेटण्यासाठी विजय हा विजयवाड्याच्या दिशेनं निघाला होता. तो त्यांच्या समर्थनासाठी जात असल्याची चर्चा आहे. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याला विजयवाडामध्ये जाण्याची परवानगी नाकारली होती. त्या घटनेचे सोशल मीडियावर देखील जोरदार प्रतिसाद उमटल्याचे दिसून आले आहे.
चंद्राबाबू यांना अटक झाल्याच्या निषेधार्ध पवन कल्याणनं रस्त्यावर झोपून त्या गोष्टीचा निषेध केला आहे. तो व्हिडिओ आता तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यावरुन पवनला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कल्याणला आंध्रप्रदेशमध्ये जायचे होते. आणि त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तेव्हा त्यानं पोलिसांच्या आठमुठेपणाला विरोध म्हणून चक्क रस्त्यावर झोपून आपला राग व्यक्त केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
.jpeg)