सदावर्ते अडचणीत! पॅनेल प्रशासनानं एसटीच्या बँकेतून शेकडो कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप
मुंबई : एसटी सहकारी बँकेवर सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलची सत्ता आहे. पण आता या पॅनेलच्या आणि सदावर्तेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एकामागून एक चुकीचे निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात सहकार आयुक्तांना एका सभासदानं पत्र लिहून तक्रार केली आहे.
सहकार आयुक्तांना पत्र
एसटी कोऑपरेटिव्ह बँकेतून ११० कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याचा गंभीर आरोप सभासदांकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात या सभासदांनी थेट सहकार आयुक्तांना पत्र लिहिलं असून या बँकेचं संपूर्ण संचालक मंडळचं बरखास्त करण्याची मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
बँकेची आर्थिक स्थिती बिघडली
गेल्या दोन ते तीन महिन्यांत या बँकेतून ११० कोटी रुपयांच्या ठेवी काढल्याचा सभासदांचा आरोप आहे. बँकेचा सध्याचा क्रेडिट डिपॉझिट रेशिया ८५ टक्क्यांहून अधिक आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, हे ठेवींचं प्रमाण साधारण ७२ टक्क्यांपर्यंत असणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा चांगली स्थिती बँकेची आहे. पण मोठ्या प्रमाणावर ठेवी काढण्यात आल्यानं बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याचा आरोपही सभासदांनी केला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.
https://www.facebook.com/reel/269309386035871
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.