जालन्यातील लाठीचार्ज : जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर !
मुंबई : जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी संध्याकाळी हिंसक वळण लागल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गृह विभागाने ही कारवाई केली आहे.जालना जिल्ह्यात झालेल्या संपुर्ण प्रकारानंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे एका वृत्तवाहिनेने म्हटले आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.