लालू यादवांच्या घरी मटणाचा बेत; राहूल गांधी यांना खावू घातले हाताने बनवलेल स्पेशल मटण
दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बिहारचे जेष्ठ नेते लालुप्रसाद यादव यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी लालुप्रसाद यादव यांनी त्यांच्या हाताने बनवलेलं मटण राहुल गांधी यांना खाऊ घातलं. तर यावेळी या दोघांमध्ये भाजपचे राजकारण, जुने किस्से अशा अनेक विषयांवर गप्पा झाल्या. यासंदर्भातील व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे.
देशातील विरोधांच्या इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बिहार येथील लोकप्रिय नेते लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली. तर लालू यांनी आपल्या हाताने स्पेशल सिक्रेट रेसिपीने राहुल गांधी यांच्यासाठी मटण बनवलं होतं.
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी लहानपणी पटना येथे मोठ्या भावांकडे गेल्यावर जेवण बनवायला शिकल्याचा किस्सा सांगितला. तसेच भारतीय अर्थव्यवस्था खराब असली की हिंदुत्वाचा मुद्द्यावर भडकावण्याचं काम भाजप करतं पण अर्थव्यवस्था चांगली असली की असं होत नाही असं का? यावरही दोघांनी चर्चा केली. यावेळी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे सुद्धा उपस्थित होते."लोकप्रिय नेते लालूजींसोबत त्यांच्या सिक्रेट रेसिपीवर आणि राजकारणाच्या मसाल्यावर चर्चा झाली. गरीब, वंचित, अल्पसंख्यांक आणि महिलांसाठी INDIA चा विचार एकच आहे - समानता प्रगती आणि सशक्तीकरण" असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.