Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( ONGC ) मध्ये जंबो भरती, त्वरीत अर्ज करा

ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( ONGC ) मध्ये जंबो भरती, त्वरीत अर्ज करा 


नवी दिल्ली  : ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ( ONGC ) जंबो भरती निघाली आहे. त्यामुळे तरुणांना देशातील सर्वात मोठा सरकारी उपक्रमात नोकरी करण्याची संधी आहे. एकूण तब्बल 2500 ॲप्रेंटीस पदांना भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरु झाली आहे. यासाठी तरुणांनी ओएनजीसीचीअधिकृत वेबसाईट ongcindia.com वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. उमेदवारांना आता येत्या 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीचे निकाल 5 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येतील असे म्हटले जात आहे.

ओएनजीसी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय ?

ऑईल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ॲप्रेंटीस पदाची भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराने B.A/B.Com/B.Sc/B.B.A/B.E./B.Tech उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. तसेच डिप्लोमा ॲप्रेंटीस पदासाठी डीप्लोमा आणि ट्रेड ॲप्रेंटीससाठी उमेदवाराला दहावी आणि बारावी आयटीआय असणे गरजेचे आहे.

उमेदवाराच्या वयाची मर्यादा किती असावी ?

ओएनजीसीच्यावतीने दिलेल्या माहीतीनूसार अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 24 दरम्यान असायला हवे.

अशी होणार उमेदवाराची निवड

उमेदवाराची ॲप्रेंटीस पदासाठी निवड परीक्षेत मिळालल्या गुणांनूसार होईल. जर गुणाची बरोबरी झाली तर अधिक वयाच्या उमेदवाराची निवड होईल.

उमेदवारांना किती स्टायपेंड म्हणजेच विद्यावेतन मिळेल

ग्रॅज्युएट ॲप्रेंटीस पदावरील उमेदवारांना 9000 रुपये वेतन मिळेल. तर डीप्लोमा ॲप्रेंटीस उमेदवाराला 8000 रुपये वेतन आणि ट्रेड ॲप्रेंटीस उमेदवाराला 7000 वेतन दिले जाईल. भरतीची अधिक माहिती मिळण्यासाठी उमेदवाराने ओएनजीसीच्या वेबसाईटवरील माहिती वाचावी

या तारखा महत्वाच्या

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 सप्टेंबर 2023

निवड होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023

ONGC Apprentice Recruitment 2023 साठी असा अर्ज करावा

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाईट ongcindia.com वर जाऊन 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकता.

https://www.facebook.com/reel/269309386035871 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.