Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फुकट तिथे चिकट, वंदे भारत एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करताना पोलिसाला पकडलं

फुकट तिथे चिकट, वंदे भारत एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करताना पोलिसाला पकडलं

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर :  प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्या देशातल्या अनेक शहरांना जोडत आहेत. सातत्याने नवनवीन मार्गांवर या ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाल्याचं आपण ऐकतो, वाचतो. हा प्रकार आता वंदे भारत एक्स्प्रेसच्या बाबतीत घडला आहे. हा विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी कुणी सामान्य व्यक्ती नाही तर शासकीय अधिकारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या या अधिकाऱ्याला टीटीईने कडक शब्दांत सुनावलं. टीटीई आणि या अधिकाऱ्याच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.


वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या आता देशातल्या अनेक शहरांना जोडत आहेत. जवळपास दर महिन्याला एका नवीन मार्गावर ही एक्स्प्रेस सुरू होत आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमधून कोणताही प्रवासी विनातिकीट प्रवास करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक पोलीस निरीक्षक विनातिकीट वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. ही बाब लक्षात येताच टीटीईने त्याला कडक शब्दांत सुनावलं.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.