दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आग; व्हिडिओ पहा
दिल्ली येथील उद्योग नगर येथील पीरा गढी परिसरात आज पहाटे एका कारखान्यात भीषण आग लागली. आगीचे स्वरुप रौद्र असून ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण 33 गाड्या घटनास्थळी तैनात आहेत.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशनम दलाला यश आले आहे. मात्र, आगीची धक कमी करण्याचे काम अद्यापही सुरु आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. आग पूर्ण नियंत्रणात आल्यानंतर घटनेची चौकशी केली जाईल. त्यानंतरच आगीचे नेमके कारण पुढे येऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

