देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील मोनिंदर पंढेर, सुरेंद्र कोलीची फाशी रद्द; निर्दोष मुक्तता!!
अवघा देश हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी मोनिंदरसिंह पंढेर आणि सुरेंद्र कोली या नराधमांची फाशीची शिक्षा रद्द करतानाच त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता. मात्र, सबळ पुराव्यांअभावी या दोघांची मुक्तता करण्यात आली आहे.
2006 मध्ये नोएडाच्या निठारी गावात भयंकर हत्याकांड उघडकीस आले. लहान मुले, अल्पवयीन मुली आणि तरुणींना ठार करून त्यांच्या मृतदेहावर बलात्कार करणे, शरीराचे तुकडे करणे असे 19 प्रकरणे उघडकीस आले होते. मोनिंदर पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली हे नराधम हत्या केल्यानंतर मुलांचे मांसही खात होते. या नराधमांना गाझियाबादच्या सीबीआय कोर्टाने 2009ला फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरुद्ध पंढेर आणि कोलीने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, पंढेरचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कोलीला तुरूंगातच राहावे लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.

