Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायलमध्ये रस, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला

मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायलमध्ये रस, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला

मणिपूरचे दोन तुकडे झालेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे एकदाही फिरकलेले नाहीत. त्यांना इस्त्रायलची चिंता आहे, पण मुले, माणसे जिथे मारली गेली, महिलांवर अत्याचार झाले त्या मणिपूरबद्दल काहीच वाटत नाही, असा जोरदार हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चढवला.

मिझोराम दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी चानमरी ते ट्रेजरी स्वायर अशी पाच कि.मी. पदयात्रा काढत स्थानिकांशी संवाद साधला. ऐजॉल येथील राजभवनाजवळ एका सभेला त्यांनी संबोधित केले. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या भाजपने मणिपुरात दुहीची बिजे पेरली आहेत. आता हे राज्य जातीच्या आधारावर विभागले गेले आहे. तिथे अनेकांच्या हत्या झाल्या, महिलांवर अत्याचार झाले तरीही पंतप्रधानांना या राज्याला भेट देणे गरजेचे वाटत नाही असे नमूद करत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला.


'अडाणी' विकास

भारतीय अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनीती समजून घ्यायची असेल तर, 'अडाणी' या एका शब्दातच त्याचे वर्णन करता येईल. सगळे काही एका उद्योजकाला मदत करण्यासाठी सुरू आहे, असा टोलाही त्यांनी मारला.

छोटय़ा व्यावसायिकांची रोजी रोटी बंद करण्यासाठीच जीएसटी योजना आणण्यात आली. यामुळे शेतकरी वर्गही दुर्बल झाला आहे. नोटबंदीचे परिणाम आपण भोगतोच आहोत. पंतप्रधानांच्या मनमानी कारभारामुळे अर्थव्यवस्थेचे खूप नुकसान झाले आहे, असे राहुल म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.