तब्बल 17 कोटी रुपयांचे जीवरक्षक इंजेक्शन देऊन 15 महिन्यांच्या मुलाला जीवनदान
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून देश आणि जगासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाईप वन स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी म्हणजेच एसएमए या आजाराने ग्रस्त सहारनपूरच्या गरीब कुटुंबातील पंधरा महिन्यांच्या भुदेव या मुलाला जीवनदान मिळाले आहे. भूदेवला 17 कोटी रुपयांचे इंजेक्शन लागणार होते. भूदेवच्या कुटुंबाने आपली सर्व मालमत्ता आणि घरे विकली असती तरीही त्यांना एवढी मोठी रक्कम जमवता आली नसती मात्र या मुलासाठी जनता, लोकप्रतिनिधी, समाजसेवक पुढे आले आणि आज त्याचाच परिणाम म्हणजे नवी दिल्ली एम्समध्ये भूदेवला हे इंजेक्शन देण्यात आले.
भूदेव याच्या आयुष्यासाठी माजी खासदार राघवलखान पाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. तसेच आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून भूदेवला मदत करण्याची विनंती केली होती. अन्य लोकप्रतिनिधींनीही आपापल्या स्तरावरून भूदेवांसाठी प्रयत्न केले होते. आता सर्वांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात असून अखेर भूदेवला जीवनाचे इंजेक्शन मिळाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.


