Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चालकाला हार्ट अटॅक, बोलेरोने 8 जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू; Video

चालकाला हार्ट अटॅक, बोलेरोने 8 जणांना चिरडलं; दोघांचा मृत्यू; Video

मुंबई : रस्ते अपघात हे कधी चालकाच्या चुकीमुळे, तर कधी इतरांच्या चुकीमुळे घडतात. त्यामुळे रस्त्याने चालताना नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे. पण कधी कधी नैसर्गिक संकट येतात, तेव्हा मग अशा अपघातांपासून वाचणं कठीण होतं. शिवाय या अपघातांना कधी कधी भयंकर रुप मिळतं. असंच काहीसं राजस्थानमध्ये घडलं. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच अंगावर काटा येईल.

खरंतर इथे एका वाहन चालकाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आल्यामुळे त्याच्या हातून गाडीचा कंट्रोल सुटला ज्यामुळे त्याने 8 जणांना चिरडलं. ही घटना जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली, ज्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


नक्की प्रकरण काय?

राजस्थानमधील नागौरमधील देगना येथे विश्वकर्मा जयंतीच्या यात्रेत मोठा अपघात झाला. यात्रेत निघालेल्या बोलेरो कारच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि कारचे नियंत्रण सुटले. कोणाला काही समजण्यापूर्वीच या वाहनाने 8 जणांना धडक दिली. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. उर्वरित सहा जणांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन आणि वाहन चालक दोघेही यात्रेचा भाग होते. अशावेळी यात्रापुढे जात होती आणि हे वाहन मागून संथ गतीने जात होते. अचानक गाडीचा ॲक्सिलेटर जोरात दाबल्याचा भास झाला. यानंतर वाहन पुढे चालणाऱ्या लोकांना चिरडत पुढे जाऊ लागले.


मिरवणुकीत सहभागी लोकांच्या म्हणण्यानुसार काही वेळातच या अनियंत्रित वाहनाने 5 जणांना चिरडले. या कारच्या धडकेने वाचण्यासाठी लोकांना खेचत असताना अन्य तीन ते चार जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाहनात चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे ही घटना घडली असं आतापर्यंतच्या तपासातून समोर आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.