‘उडान’ फेम अभिनेत्री कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अमृतसरमधील पार्वती देवी रुग्णालयात निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या.
सर्फ जाहिरातींमध्ये ललिता ही भूमिका
अभिनेत्री-निर्माती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कविता यांच्या मैत्रिण सुचित्रा वर्मा यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले की,” कविता काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. गेल्या वर्षी जेव्हा भेटले होते तेव्हा कविताने त्यांना केमोथेरपीबद्दल माहिती दिली होती. त्यावेळी त्या वेदनेने त्रस्त होत्या. पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या की, “तिला गमावल्यामुळे मला वाईट वाटते आहे आणि तिला भेटण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. तिची प्रकृती अचानक इतकी बिघडेल हे मला कधीच माहीत नव्हते,.कविता यांनी १९८९ मधील सुपरहिट टीव्ही शो ‘उडान’ मध्ये IPS ऑफिसरच्या भूमिका केली. या भूमिकेने त्यांना एक ओळख निर्माण केली होती. ९० च्या दशकातील सर्फ जाहिरातींमध्ये ललिताजी यांची भूमिका त्यांनी साकारली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.