पोलिसांनी परवानगी नाकारली; मराठा बांधवांचे चौकीतच आंदोलन
वाघोली : वाघोली मध्ये सकल मराठा बांधवांच्या वतीने आरक्षणाबाबतीत रास्ता रोको करण्यासाठी व जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात यासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने वाघोली पोलीसांकडे परवानगीची मागणी केली. ती पोलिसांनी नाकारल्याने पोलीस चौकीतच मराठा बांधवांचे आंदोलन सुरू झाले.
यावेळी वाघोली परिसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने वाघोली पोलीस चौकीतच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आँल्या यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मराठा बांधवांच्या वतीने एसीपी संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.