Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रशांत कदम खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघाना केले अटक

प्रशांत कदम खून प्रकरणी शहर पोलिसांनी दोघाना केले अटक 

सांगली : पूर्वीच्या वाकूडपणाच्या रागातून सपासप वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील खाणभागात हा  प्रकार घडला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रशांत विश्वनाथ कदम ( वय 40, रा.खाणभाग ) याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणात आदीत्य ऊर्फ मॅक्सी रमेश भारती (वय १९ , रा.तिवारी गल्ली,खणभाग, आणि आर्यन चंद्रकांत नाईक ( वय १८, रा. पाटणे गल्ली, खणभाग) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी प्रशांत  कदम  हा बुधवारी रात्री खाणभागातील ओंकार चौकातील कट्ट्यावर बसला होता. त्यावेळी संशयितानी जून्या भांडणाचा राग मनात धरुन  धारदार  शस्त्रानी प्रशांत कदम याचा खुन करण्याच्या हेतूने हल्ला केला. कदम याच्या डोक्यात वार करण्यास सुरूवात झाली, त्यावेळी त्याने डोके वाचविण्यासाठी दोन्ही हात मध्ये घातले, त्यामुळे त्याच्या हातावर वार झाले. तो जखमी होवून कट्टयावर खाली पडला असताना हल्लेखोरापैकी एकाने पायावर आणि एकाने पोटात वार करून गंभीर जखमी करून खून  करण्याचाचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास करताना  सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना संशयित  धामणी रोड परिसरात लपुन बसल्याची माहीती मिळाली. त्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
  

ही कारवाई  पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव  यांच्या मार्गदशानाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, हवालदार संदिप पाटील, विनायक शिंदे, सचीन शिंदे, संदीप पाटील, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, गणेश कांबळे, योगेश सटाले, सुमित सुर्यवंशी, पृथ्वीराज कोळी तसेच सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.