Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिटात ठेवा फक्त 'ही' एक वस्तू; काही दिवसांत व्हाल मालामाल

पाकिटात ठेवा फक्त 'ही' एक वस्तू; काही दिवसांत व्हाल मालामाल

जर तुम्हाला आर्थिक तंगी दूर करायची असेल असेल आणि जीवनात आर्थिक प्रगती हवी असेल तर तुम्ही काही वास्तू टिप्स फॉलो करू शकता. या वास्तू टिप्स तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतील आणि तुमचे उत्पन्न वाढवतील.

जगातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचं पाकीट नेहमी पैशाने भरलेलं राहावं आणि त्याला कधीही पैशांची कमतरता भासू नये. परंतु कधी-कधी चांगला पगार आणि नोकरी असूनही आपलं पाकीट काही दिवसांत रिकामं होतं. मुळात, आपला खर्च वाढतो आणि उत्पन्न निम्म्यावर येतं.

रिकामं पाकीट पाहून मनाला काय वाटतं हे जो या दिवसांतून गेला आहे, तोच व्यक्ती समजू शकतो. तुम्हाला कधी अशा दिवसांना सामोरं जावं लागू नये, अशी तुमची इच्छा असेल तर वास्तुशास्त्रातील काही टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकटं दूर करू शकता. तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी काही वास्तू उपाय जाणून घेऊया, ज्यामुळे तुमचं पाकीट नेहमी पैशाने भरलेलं राहील.

नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवा

काही लोक आपल्या पाकिटात नाणी आणि नोटा एकाच कप्प्यात ठेवतात. नाणी आणि नोटा एकत्र ठेवल्याने तुमची आर्थिक समृद्धी हिरावली जाऊ शकते. वास्तु उपायांनुसार, आर्थिक प्रगतीसाठी पाकिटात नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात.

काही लोक आपल्या पाकिटात नाणी आणि नोटा एकाच कप्प्यात ठेवतात. नाणी आणि नोटा एकत्र ठेवल्याने तुमची आर्थिक समृद्धी हिरावली जाऊ शकते. वास्तु उपायांनुसार, आर्थिक प्रगतीसाठी पाकिटात नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात.

तांदळाचे दाणे ठेवा

वास्तुशास्त्रात आर्थिक समस्या दूर ठेवण्यासाठी पाकिटात तांदळाचे दाणे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमचा खर्च सतत वाढत असेल किंवा तुमचे पैसे रोज अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असतील तर पाकिटात सात ते आठ तांदळाचे दाणे ठेवा. याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून येईल.

पाकिटात कोणतीही जुनी बिलं ठेवू नका

अनेकांना जुनी बिलं पर्समध्ये ठेवण्याची सवय असते. याशिवाय, तुम्ही तुमच्या पर्समध्ये एटीएम स्लिप ठेवता, परंतु तुमची ही सवय तुमच्यासाठी आर्थिक अडचणी आणते हे तुम्हाला समजत नाही. वास्तुशास्त्रानुसार, पाकिटात जुनी बिलं ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. तुमच्या पाकिटात जुनी बिलं किंवा स्लिप कधीही ठेवू नका.

चांदीचं नाणं ठेवा

दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाच्या पूजेतही चांदीचे नाणं ठेवलं जातं. हे नाणं तुमच्या पाकिटात ठेवा, यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. हा उपाय केल्यास तुमचं पाकीट कधीही रिकामं राहत नाही.

लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा

जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर पाकिटात लक्ष्मीचा फोटो ठेवा. यामुळे धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच कृपा करेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.

(टीप : वरील सर्व बाबी 'सांगली दर्पण' केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून सांगली दर्पण कोणताही दावा करत नाही.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.