Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शारीरिक संबंधासाठी तरुणी देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले: पुण्यातील प्रकार

शारीरिक संबंधासाठी तरुणी देण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले: पुण्यातील प्रकार 


शारीरिक संबंधासाठी तरुणी देतो असे सांगून एका तरुणाला मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्यासाठी तिन जणांनी तरुणाकडून फोन पे वरून 43 हजार रुपये घेऊन लुटले. हा प्रकार 24 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील खदाणी जवळ असलेल्या मोकळ्या जागेत घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत विशाल राजेंद्र नलावडे (वय-22 रा. मरकळ रोड, आळंदी, पुणे) याने शनिवारी (10) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आदिल व त्याच्या दोन साथीदारांवर आयपीसी 392, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शरीर संबंधासाठी मुलगी देतो असे सांगून खदाणी जवळच्या मोकळ्या जागेत घेऊन गेले. आरोपी व त्याच्या मित्रांनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच फिर्यादी यांच्याकडून फोन पे नंबऱ घेतला. त्यानंतर फोन पे द्वारे जबरदस्तीने 43 हजार रुपये काढून घेऊन मोबाईल घेऊन पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.