Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घराला कुलूप लावून गेला पळून, पुण्यातील घटना

Breaking News ! पोटच्या मुलाकडून आईची निर्घृण हत्या; घराला कुलूप लावून गेला पळून, पुण्यातील घटना 

शरद मोहळ हत्येनंतर पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्यात. अशात पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खूनाची घटना समोर आली आहे.

पोटच्या मुलानेच आपल्या आईचा खून केला आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, खडकी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत ५५ वर्षीय आईचा मुलाने निर्घुन पद्धतीने खून केला आहे. ज्ञानेश्वर असं आरोपी मुलाचं नाव आहे. आईला संपवल्यावर त्याने घरातून पळ काढला असून तो फरार आहे.

गुंभाबाई शंकर पवार असं मृत आईचं नाव आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाढवताना लहानाचं मोठं करताना हा दिवस कधी पहावा लागेल याचा तिने विचारही केला नसेल. मुलाने आईची हत्या आपल्या राहत्या घरात केली. कुणाला संशय येऊनये म्हणून घराला कुलूप लावून त्याने तेथून पळ काढला. खडकी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू काल पुण्यामध्ये आत्महत्येची घटना समोर आली होती. पुण्यातील औंधमध्ये आर्थिक वादातून रिक्षा चालकाने सराफ व्यावसायिकावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली असून जखमी आकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.