कोर्ट रुममध्येच नवऱ्याला मारायला लागली बायको; Video पाहा
नवी दिल्ली : नवरा-बायकोमधील प्रेम, वाद कायमच पहायला मिळत असतो. मात्र अनेकदा वाद एवढा वाढतो की थेट घटस्फोट किंवा कोर्टात पोहोचतो. सामंजस्य दाखवत दोघांनाही कोर्टाचं ऐकून निर्णय दिला जातो. मात्र काही वेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते. कोर्ट रुममध्येही भांडण, वाद थांबत नाहीत. असाच काहीसा प्रकार घडलेला समोर आला.
नवरा बायकोचा वाद कोर्ट रुमपर्यंत गेला मात्र ते तिथे जाऊनही भांडत राहिले आणि शेवटी त्यांना थांबवायला पोलिसांनाच बोलवावं लागलं. नवरा बायकोचा वाद कोर्टमध्ये गेल्याचा एक प्रकार समोर आलाय. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बायको तर नवऱ्यावर हातही उचलताना दिसून आली.
नवरा बायकोच्या भांडणाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कोर्ट रुम दिसत आहे. कोर्टमध्ये भरपूर गर्दी आहे. दोघांच्याही वादावर सुनावणी सुरु असते मात्र अचानक बायकोला नवऱ्याच राग येतो आणि ती त्याला भर कोर्टातच मारायला लागते. ती त्याच्या थोबाडीत मारते त्याला चापट मारते. शेवटी त्यांचा वाढलेला वाद पाहून पोलिसांना बोलवावं लागतं.
@gharkekalesh नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 22 सेकंदांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहेत. दरम्यान, प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद हा होतच असतो. मात्र काही प्रकरणांत हा वाद कोर्टात जातो. तिथेही एकमेकांचे आरोप ऐकून आणि कोर्टाच्या सुनावणीला ऐकून घेतानाही काही भांडत राहतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.