ओलांडू नका ही लक्ष्मण रेषा, ट्रक चालकाची भन्नाट युक्ती; Video पाहा
दरवर्षी रस्ते अपघातात जगभरात लाखो लोकांचा जीव जातो. बहुतांश बरेच अपघात हे ओव्हरटेक करण्याच्या नादात होतात. अशा प्रकारे अपघात होऊ नये म्हणन एका ट्रक चालकाने भन्नाट शक्कल लढवली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हायरल होणारा व्हिडीओ चर्चेच्या मुद्दा बनलाय. हा व्हिडीओ जपानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सामान भरून जात असलेल्या ट्रकच्या मागे काही मीटर अंतरावर एक हिरव्या रंगाची लेझर लाईटची रेष दिसते. हीच सुरक्षेची लक्ष्मणरेषा म्हणता येईल.
या ट्रक चालकाने त्याच्या ट्रकच्या मागच्या बाजुला काही लेझर दिवे लावले आहेत. ही रेषा ओलांडू नका आणि सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवा. अचानक गाडी थांबवल्यास मागच्या गाडीचा अपघात होणार नाही असं त्या चालकाचे मत आहे. एक्सवर एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. शिवाय या व्हायरल व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.