कशी बनवले जाते सोन्याची साखळी? पाहा Video
नवी दिल्ली : सोन्याचे दागिने खरेदी करण्याची अनेकांना हौस असते. याशिवाय एक गुंतवणूक म्हणूनही लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे लोकांचा सोनं खरेदीकडे अधिक कल असतो. सोन्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतात. तुम्ही कधी सोन्याचे दागिने बनवताना पाहिलंय का? सध्या एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये सोन्याची साखळी कशी बनवली जाते? लग्नाचा हंगाम सुरु असून लोक सोनं खरेदी करत आहेत. अशातच सोन्याची साखळी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये सोन्याची साखळी कशी बनवली याविषयी दाखवलं आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सोनं कसं वितळलं जात आहे आणि नंतर ते साच्यात टाकलं जातंय. हे सोनं घट्ट झाल्यावर त्याला हातोड्याने मारून पातळ काडी बनवली जातेय. ती दांडी गोल बांगडीसारखी बनवली जाते. त्यानंतर आगीनं सोने थोडं मऊ केलं जातं आणि नंतर त्याचे छोटे तुकडे केले जातात. यानंतर, ते तुकडे एकत्र जोडले जातात आणि त्यांना साखळीचा आकार दिला जातो.
ही सोन्याची साखळी बनवण्याची प्रक्रिया सध्या चांगलीच व्हायरल होतेय. @HowThingsWork_ नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 57 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनवत असून व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.