Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, टॅक्सी दरीत कोसळून 10 ठार

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, टॅक्सी दरीत कोसळून 10 ठार 


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी कॅब टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू झाला. रामबन परिसरात हा अपघात घडला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि रामबनचे नागरी जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे. महामार्गावरील एक व्हिडिओ ANI ने X वर शेअर केला असून त्यात घटनास्थळी बचावपथक दरीत उतरून बचावकार्य करताना दिसत आहे. रामबन भागातील बॅटरी चष्माजवळ जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ही एक प्रवासी टॅक्सी जम्मूहून श्रीनगरला जात असताना हा अपघात झाला. यात कॅबमधून प्रवास करणाऱ्या १० प्रवाशांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पहाटेपासून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १० जणांचे मृतदेह दरातून बाहेर काढले आहेत. दरम्यान, या ठिकाणी सतत पाऊस पडत आहे.

पोलिसांनी सांगितले की, मध्यरात्री १.१५ च्या सुमारास या अपघाताची माहिती मिळाली. एक टॅक्सी (तवेरा) राष्ट्रीय महामार्ग-४४ वर बॅटरी चष्माजवळ सुमारे ३०० मीटर दरीत कोसळल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबियाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. या अघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस, एसडीआरएफ आणि सिव्हिल क्यूआरटी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य सुरू आहे. मी सतत संपर्कात आहे, असे त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.