Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

20 वर्षापासून पतीकडून भरपूर प्रेम मिळत होते, तरीही माहिलेला लफडं करण्याची अजब सवय

20 वर्षापासून पतीकडून भरपूर प्रेम मिळत होते, तरीही माहिलेला लफडं करण्याची अजब सवय 

कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. ज्या दिवशी नात्यातील विश्वास संपतो तेव्हा एकतर नातं केवळ नावाला राहतं किंवा दोघांचेही मार्ग वेगळे होतात. पण एका महिलेने तिची कहाणी सांगून सगळ्यांनाच अचंबित केलं आहे. या महिलेच्या लग्नाला 20 वर्षे झालीत. तिचं तिच्या पतीवर प्रेमही आहे. पण ती स्वत:ला दुसऱ्या पुरूषांसोबत अफेअर करण्यापासून रोखू शकत नाही. तिचं मत आहे की, ती घरात पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडत थकली आहे. आपल्या प्रियकरांना भेटून तिला चांगलं वाटतं.


धक्कदायक बाब म्हणजे 20 वर्षाच्या लग्नात ती पतीला 14 वर्षापासून दगा देत आहे. यादरम्यान तिने 8 अफेअर केलीत. तिचं मत आहे की, तिला हे माहीत आहे की, हे सगळं चुकीचं आहे. पण आनंदही आहे की, आजपर्यंत पतीला याची काहीच माहिती नाही.

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, महिलेने आपली ओळख लपवून मेल ऑनलाइनला एक लेटर लिहिलं. त्यात ती म्हणाली की, ती पर पुरूषांसोबत लैंगिक संबंधही ठेवते. ती प्रत्येकवेळी स्वत:ला सांगते की, आता पुन्हा असं करणार नाही. पण नंतर स्वत:ला रोखू शकत नाही.

महिलेचं वय 44 असल्याचं समजतं. ती म्हणाली की, जर तिच्या टीनेजर मुलीला आणि पतीला याबाबत समजलं तर त्यांना धक्का बसेल. पण तरीही ती स्वत:ला रोखू शकणार नाही. पहिल्यांदा तिचं अफेअर तिच्यापेक्षा वयाने लहान तरूणासोबत झालं होतं. तो तिला तिच्या ऑफिसजवळच्या एका जिममध्ये भेटला होता. त्यानंतर ती थांबली नाही.

ज्या लोकांसोबत तिचे अफेअर होते त्यांना रिलेशनशिप पुढे न्यायचं नव्हतं. कारण महिला विवाहित होती. तिने सांगितलं की, एकदा पतीची नजर फोनवर पडली होती. वाटलं होतं की, आता त्याला सगळं कळणार. मेसेज जिममधील लव्हरने पाठवले होते. पण पतीने कोणतेही अश्लील मेसेज पाहिले नाही. त्याने केवळ जिम कधी सुरू झाला हे विचारलं. यानंतर महिलेने सांगितलं की, सध्या तिचं तिच्या सहकाऱ्यासोबत अफेअर सुरू आहे. जो तिच्या घराजवळच राहतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.