Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रात भाजपचे 23 उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदरांचा पत्ता कट, कोणाला मिळालं तिकीट...

महाराष्ट्रात भाजपचे 23 उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदरांचा पत्ता कट, कोणाला मिळालं तिकीट...


महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे अशी पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपाने देशपातळीवर पाच याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातली दुसरी यादी आणि पाचवी यादी यामध्ये महाराष्ट्रातले २३ उमेदवार जाहीर झाले आहेत.

भाजपाने २०१९ मध्ये २३ जागा जिंकल्या होत्या. त्यानुसार भाजपाने २३ उमेदवार जाहीर केले आहेत. पूनम महाजन यांची जागा वगळता भाजपाने २३ उमेदवारांना लोकसभेचं तिकिट दिलं आहे. यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांनाही स्थान देण्यात आलं आहे. तर पाच विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपाने कापला आहे. आपण जाणून घेऊ भाजपाने किती जणांना कुठून उमेदवारी दिली आहे?

पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट

भाजपाने आत्तापर्यंत जी २३ नावं जाहीर केली आहेत त्यानुसार पाच विद्यमान खासदारांची तिकिटं कापण्यात आली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगवाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपाने तिकिट दिलेलं नाही. तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकिट देण्यात आलं आहे.

विद्यमान खासदारांच्या जागांवर कुणाची वर्णी?

गोपाळ शेट्टींऐवजी पियूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेचं तिकिट

मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचांना मुंबई उत्तर पूर्व मधून लोकसभेचं तिकिट

बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे लोकसभेच्या मैदानात

जळगावमधून उन्मेष पाटील यांच्याजागी स्मिता वाघ यांना तिकिट

सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामींच्या ऐवजी राम सातपुते यांना तिकिट.

आत्तापर्यंत भाजपाचे जाहीर झालेले २३ उमेदवार कोण?

१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते

भाजपाने लोकसभेसाठी २३ नावांची यादी आत्तापर्यंत जाहीर केली आहे. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी किती जागा मिळणार? हे स्पष्ट झालेलं नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसने १२ जणांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी मंगळवारी जाहीर केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कुणाला कुठून उमेदवारी दिली जाणार? हे पाहणं रंजक असणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.