Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पत्नीकडे की निष्ठावान सहकारीकडे धुरा सोपवणार! अरविंद केजरीवाल कोणाला उत्तरअधिकारी निवडणार.....

पत्नीकडे की निष्ठावान सहकारीकडे धुरा सोपवणार! अरविंद केजरीवाल कोणाला उत्तरअधिकारी निवडणार.....

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ते राजीनामा देणार नाहीत असे त्यांच्या पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. समर्थकांचे म्हणणे आणि दावे एकीकडे आणि प्रत्यक्ष राजकारण वेगळे भलेही केजरीवालांना आज दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास बाध्य केली जाण्याची कोणती तरतूद नसेल. केजरीवालांनी हा पर्याय अवलंबायचा ठरवले तर आता त्यांच्यासमोर दोन किंवा तीन नावे आहेत. त्यांच्यावर ते विसंबून राहतील एवढे त्यांच्या सहकाऱ्यांचे वय आणि अनुभव नाही. किंबहुना मुळात केजरीवाल यांचाच तो स्वभाव नाही की ते कोणाकडे धुरा सोपवू शकतील.

या मुद्द्याच्या समर्थनार्थ कुमार विश्‍वास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आदी उदाहरणे दिली जातात. केजरीवालांची ही पक्षांतर्गत स्पर्धकांची आणि तोलामोलाच्या व्यक्तींची नावे होती.नंतर ही सगळी मंडळी आपमधून बाहेर पडली व का पडली याकडे लक्ष वेधत काही कारणे सांगितली जातात. त्यामुळे केजरीवाल मांझींसारखा कोणी उत्तराधिकारी नियुक्त करण्याची जोखीम पत्करतील अशी शक्यता नाही. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार बिहारमध्येच लालू प्रसाद यादव यांनी तुरूंगवारीच्या काळात पत्नी राबडी देवी यांच्याकडे बिहार सोपवला होता. राबडींचे यथातथा शिक्षण किंबहुना केवळ अक्षरांची ओळख एवढेच शिक्षण असलेल्या राबडी मुख्यमंत्री झाल्या. त्या तुलनेत केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता या आयआरएस आहेत.


सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्या शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या जोरावर सक्षम कारभार करू शकतात. शिवाय पत्नी असल्यामुळे केजरीवालांसाठी हा पर्याय योग्य आहे. मात्र आपल्या पत्नीलाही कायद्याच्या कचाट्यात आणायचे का हा विचार तेही करतील आणि त्यामुळे कदाचित सुनीता केजरीवाल यांचे नावही मागे पडू शकते. मात्र तोच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो आणि गरज भासलीच तर केजरीवाल तसेच करतील असेही मानले जाते आहे.

मात्र ही काही आदर्श व्यवस्था नाही याची केजरीवाल यांना स्वत:ला कल्पना आहे. त्याचे कारण दिल्लीचे नायब राज्यपाल गव्हर्नन्सचा मुद्दा उपस्थित करून सरकारच्या बरखास्तीची शिफारस करू शकतात व हे केजरीवाल यांना मानवणारे नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. फक्त त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ते कोणाची निवड करतील हे पाहावे लागेल. 

केजरीवाल यांच्यासमोर दोन मॉडेल अर्थात दोन पर्याय आहेत. एक म्हणजे ते नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एकदा केला होता तसा प्रयोग करू शकतात. नितीश यांना जेंव्हा मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते तेंव्हा त्यांनी त्यांचे अत्यंत निष्ठावान सहकारी जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केले होते. मांझी आपल्या शब्दांत राहतील असा त्यांचा त्यामागे उद्देश होता. मात्र मांझी यांनी त्यांचे अंदाज फोल ठरवले आणि त्यांना झटके देण्यास सुरूवात केली. नंतर नितीश यांना हे प्रकरण फार अवघड गेले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.