Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नवऱ्याने 26 वर्ष्याच्या पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल

नवऱ्याने 26 वर्ष्याच्या पत्नीसह 2 मुलींना जिवंत जाळल

पतीने दारुच्या नशेत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अहमदनर तालुक्यातील वडगाव लांडगा इथं घडली आहे. संशयाचं भूत डोक्यात शिरलेल्या पतीने पत्नीसह मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जाळले. सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीसह दोन मुलींना जाळल्यानंतर पती घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली निवांत बसला होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे याने त्याची वर्षीय पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी दोघांना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

आरोपी सुनिल लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारुच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत.

पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असतानी सोमवारी सकाळी नऊ वाजता पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले. पत्नी लिलाबाई (वय 26 वर्ष), मुलगी साक्षी (वय 14 वर्षे) व खुशी नऊ महिने यांना मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.