Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तिकीट मिळाले नाही म्हणून चक्क खासदाराने विषप्राशन केले

तिकीट मिळाले नाही म्हणून चक्क खासदाराने विषप्राशन केले

चेन्नई :  लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आपला तिकीट मिळावे म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. ज्यांना तिकीट मिळाले आहे ते आनंदाने नाचत आहेत तर ज्यांचे तिकीट कापले गेले ते हिरमुसले आहेत.


तामिळनाडूतील इरोडचे खासदाराने मात्र त्यांना तिकीट जाहीर झाल्याने भलतेच मनाला लावून घेतले आहे. त्यांनी थेट विषप्राशन केल्याची घटना घडर्ली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तामिळनाडू येथील इरोडचे लोकसभा खासदार ए. गणेशमूर्ती यांनी रविवारी थेट विष प्राशन केल्याचे उघडकीस आले. ते त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत सापडले. 

असे म्हटले जाते की ए. गणेशमूर्ती यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलने त्यांचे मेडीकल अपडेट जाहीर केलेले नाहीत. एमडीएमके नेत्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की डीएमके पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते मानसिक दडपणाखाली होते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

ए. गणेशमूर्ती हे 76 वर्षांचे आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ए. गणेशमूर्ती यांनी आपल्या एआयएडीएमके प्रतिस्पर्धी जी. मणिमारन यांना 2,10,618 मतांनी हरविले. या निवडणूकीत एमडीएमकेचे संस्थापक वायको यांनी त्यांचा मुलगा दुई वायको यांच्या उमेदवारीला प्राधान्य दिले. आणि एमडीएमकेला इरोड ऐवजी तिरुची सीट मिळावी यासाठी प्रयत्न केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.