Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! सारखपुडा झाला पण होणारी बायको बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्..

धक्कादायक! सारखपुडा झाला पण होणारी बायको बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्..

अहमदाबाद : लग्न ठरल्यानंतरचा किंवा साखरपुड्यानंतरचा काळ हा जोडप्यांसाठी अतिशय खास असतो. या काळात ते एकमेकांसोबत बोलू लागतात, एकमेकांना समजून घेऊ लागतात. मात्र, कधीकधी हाच काळ अतिशय वाईटही ठरू शकतो.

याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साखरपुड्यानंतर होणारी बायको त्याच्याशी नीट बोलत नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. यामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. आनंद जिल्ह्यातील नापाड गावातील 23 वर्षीय समीर राठोड वडोदरातील कोयाली गावात आपल्या मामासोबत राहत होता. त्यांच्यासोबतच गेट सुपरवायझर म्हणून काम करत होता. गुरुवारी तो अचानक बेपत्ता झाला. यानंतर शुक्रवारी नंदेसरी जीआयडीसीजवळ एक मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता मृतदेह समीरचा असल्याचं समजलं. मृतदेहाजवळ रिव्हॉल्व्हर सापडलं. पोलिसांच्या तपासात हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांची चौकशी केली. समीरचा मोबाईलही तपासला. यावेळी आत्महत्येची पुष्टी झाली.

या प्रकरणी एसीपी आर. डी. कवणे यांनी सांगितलं की, समीरची 5 दिवसांपूर्वी एंगेजमेंट झाली होती. पण, त्याची होणारी पत्नी त्याच्याशी बोलत नव्हती. हा प्रकार तरुणाने त्याच्या मित्राला चॅटमध्ये सांगितला होता. याच कारणावरून त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वडोदराच्या जवाहरनगर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.