Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार ? हातकणंगलेतून विनय कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार ? हातकणंगलेतून विनय कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विक्रमी मतदान घेतल्याने खासदार माने यांचा विजय सुकर झाला. लोकसभेच्या हातकणंगले मतदारसंघातील  विद्यमान खासदार धैर्यशील माने  विरुद्ध आमदार प्रकाश आवाडे यांच्यात रंगलेला कलगीतुरा, तसेच श्री.माने  यांचा मतदारसंघात संपर्क नसल्याचा होत असलेला आरोप आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरून या मतदारसंघातून महायुतीतर्फे 'जनसुराज्य'चे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे  यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत.

विद्यानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व डॉ. कोरे यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. आताच त्याचा गवगवा न करता अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात कोरे यांची उमेदवारी जाहीर करण्याची रणनीती आहे.

भाजपने लोकसभेच्या राज्यातील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपच्या मित्र पक्षांतील दिग्गजांना रिंगणात उतरण्यात येणार आहे. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुंताश सर्वच मतदारसंघात महायुतीसमोर आणि पर्यायाने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. अशात ज्या खासदारांविरोधात नाराजी आहे, त्यांनाच उमेदवारी देण्याचा धोका टाळण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी सुरुवातीला 'स्वाभिमानी'चे माजी खासदार राजू शेट्टी  यांनाच गळ घालण्याचा प्रयत्न झाला; पण श्री. शेट्टी स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत, हे लक्षात आल्यानंतर भाजपने पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे.

लोकसभेसाठी चाचपणी करताना उमेदवार सर्वमान्य असावा, त्यांचा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मतदारसंघात संपर्क असावा, जातीची गणिते या सर्वांचा अभ्यास केला जात आहे. त्यातूनच डॉ. कोरे यांना रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. हातकणंगले मतदारसंघात येणाऱ्या सहापैकी वाळवा व हातकणंगले मतदारसंघ सोडला तर अन्य चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. हे राजकारणही डॉ. कोरे यांना रिंगणात उतरण्यामागे आहे.

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने विक्रमी मतदान घेतल्याने खासदार माने यांचा विजय सुकर झाला. याबरोबरच जातीचे राजकारणही श्री. माने यांच्या विजयात महत्त्वा‍चे ठरले आहे; पण आता 'खासदारांनी काय काम केले' अशी थेट विचारणा करून आमदार प्रकाश आवाडे यांनी श्री. माने यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोध केला आहे. श्री. शेट्टी रिंगणात उतरले आणि महाविकास आघाडीने त्यांना न मागता पाठिंबा दिला तर इथली महायुतीची जागा अडचणीत येऊ शकते, याचाही विचार डॉ. कोरे यांना उमेदवारी देण्यामागे असल्याचे बोलले जाते.

डॉ. कोरे यांच्या जमेच्या बाजू शिरोळ, इचलकरंजी, शिराळ्यात महायुतीचे व स्वतः शाहूवाडीचे आमदार असल्याने ताकद आहे. हातकणंगले व वाळवा, शिराळा मतदारसंघात महाडिक गटाची लक्षणीय ताकद पाठीशी 'राजाराम'च्या निवडणुकीतील परतफेड महाडिक यांच्याकडून होण्याची शक्यता वारणा कारखाना व दूध संघाचे सांगली जिल्ह्यात त्यातही शिराळा व वाळवा तालुक्यातील कार्यक्षेत्र तीन तालुक्यांतील जातीची समीकरणे शेट्टी स्वतंत्र असले तर डॉ. कोरे यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या मतांची होणारी संभाव्य विभागणी सहकारासह शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून केलेले काम, त्यातून संपर्क लोकसभेला निकाल वेगळा लागला तरी विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून भाजपचा पाठिंबा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.