Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खबरदार! अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणाल तर याद राखा! तर जेलची हवा खावी लागेल,उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

खबरदार! अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणाल तर याद राखा!  तर जेलची हवा खावी लागेल,उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

काही माणसांचा स्वभाव हा फटकळ असतो. कधी कोणाला काय बोलतील हे सांगू शकत नाही. पण तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. असेच एक प्रकरण कोलकातामध्ये घडले असून एका व्यक्तिने अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणून हाक मारली होती. त्यामुळे सदर महिलेने त्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला.

सदर घटना कोलकातामध्ये घडली होती. पोलिसांचे एक पथक दुर्गा पूजेच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी लाल टिकरी या ठिकाणी जात होते. या पथकामध्ये पीडित महिला पोलीस कॉन्स्टेबलचा सुद्धा समावेश होता. वेबी जंक्शनवर एका चोरट्याला पकडून त्यांनी पोलीस ठाण्यात नेते. तर पीडितेचा समावेश असलेले पोलिसांचे पथक जंक्शनवरच थांबले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्यांनी जवळील उजेड असलेल्या एका दुकानासमोर जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा पोलिसांचे पथक दुकानासमोर पोहोचले तेव्हा तिथे असणाऱ्या आरोपीने महिला कर्मचाऱ्याला, डार्लिंग चलान करायल आली आहे का? अशा शब्दांमध्ये विचारणा केली. त्यामुळे महिलेने सदर व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला.

मयाबंदर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354A (1) (IV) आणि 509 (शब्द, हावभाव किंवा महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने एखादे कृत्य) अंतर्गत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. सदर प्रकरणावर पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपी जनक रामला शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनोळखी महिलेला डार्लिंग अशा शब्दांनी संबोधणे हा गुन्हा आहे. 

कलम 354A (महिलेचा मानभंग होईल असे वर्तन करणे) संदर्भ देत न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की, या कायद्यान्वये अश्लील शब्दांचा वापर दंडनीय गुन्हा आहे. महिला पोलीस आहे की नाही हा दुय्यम मुद्दा आहे. मुळात रस्त्यावरील अनोळखी महिलेला डार्लिंग म्हणणे अपमानास्पद आहे आणि वापरलेला शब्द मुळात एक अश्लील टिप्पणी आहे. तसेच आपला बचाव करताना आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचा दावा केला होता. पण ते सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.