Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार का नाही? जाणून घ्या हा आहे कळीचा मुद्दा

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार का नाही? जाणून घ्या हा आहे कळीचा मुद्दा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्यापूर्वीच भाजपने मोठी खेळी खेळली आहे. भारतीय जनता पक्षाने शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

यात जवळपास सर्वच मोठ्या राज्यातील जागांचा समावेश आहे. अपवाद आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रातील 48 पैकी एकाही जागेवर भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. यामागचं कारण लपलंय जागावाटताप. कारण, अनेक लोकसभेच्या सीट महायुतीत कळीच्या मुद्दा ठरत आहेत.

लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात तशा राजकिय पक्षांच्या जागावाटपाच्या फॉर्मुला काय असणार यावर चर्चा रंगू लागल्यात. राज्यातील महायूतीचा जागावाटप अंतीम झाले नसले तरी बदलेल्या राजकिय परिस्थितीत अनेक मतदारसंघांची आणि उमेदवारांची अदलाबदल होणार हे आता निश्चित झालंय. शिवसेनेच्या ज्या जागांवरून रस्सीखेच सुरू आहे.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय असणार याकडे सर्वाचे लक्ष लागलंय. अब की बार 45 पार अशी घोषणा महायुतीचे नेते राज्यात देत आहेत. पण ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उमेदवारांनाही प्रचारासाठी पुरेसा वेळ देणं महत्वाचं आहे. त्यासाठी लवकर जागावाटप करून उमेदवारांना ग्रीन सिग्नल देणं गरजेचं आहे. पण महायुतीचं अजून जागावाटपाचं अंतीम होत नाहीये. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि घटक पक्ष यांना किती आणि कोणती जागा सोडायची यावर अजून खलबतं सुरू आहेत. विशेषता 2019 च्या शिवसेनेच्या विजयी आणि पराभूत मतदारसंघावर रस्सी खेच सुरू आहे. यापैकी ज्या जागांवरून देवाण घेवाण सुरू आहेत. त्याचीच माहीती जाणून घेऊयात ग्राफिक्सचा माध्यमातून.

शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार कोणाचा?

1) दक्षिण मुंबई
भाजप की शिवसेना

2) पालघर
भाजप की शिवसेना

3) शिरूर

4) रत्नागिरी-सिंधुदुर्ग
शिवसेना की भाजप

5) रामटेक
शिवसेना की भाजप

6) अमरावती
शिवसेना की भाजप

7) रायगड
शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस

8) धाराशिव
शिवसेना की भाजप

9) नाशिक
शिवसेना की राष्ट्रवादी काँग्रेस

10) छत्रपती संभाजी नगर
शिवसेना की भाजप

11) परभणी

शिवसेना की भाजप

संयुक्त शिवसेनेनं 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 18 मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले तर 4 मतदारसंघात शिवसेना उमेदवारांचा पराभव झाला. या 18 विजयी खासदारांपैकी 13 खासदार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेत आहे. त्यापैकी किती खासदारांना परत उमेदवारी मिळतेय आणि किती उमेदवारांची महायुतीच्या पक्षांमध्ये अदला बदल होतेय. याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलंय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.