Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने भाजप नेत्याची गाडी थांबवली; अन् गोळ्या झाडल्या

लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने भाजप नेत्याची गाडी थांबवली; अन् गोळ्या झाडल्या

जोनपूर: भाजप नेते प्रमोद यादव काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घरातून निघाले होते. घरापासून दहा पावलांच्या अंतरावर ब्रेकर होता, तेथे दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना पाहिले, त्यातील एकाने त्यांना लग्नाची पत्रिका दाखवली. प्रमोद गाडी थांबवून बोलू लागले. यादरम्यान कार्ड देताच बदमाशांनी गोळीबार सुरू केला आणि या गोळीबारात प्रमोद यादव यांचा मृत्यू झाला. 

आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान भाजपा नेते प्रमोद कुमार यादव हे गावातील घराबाहेर पडले होते. ते त्यांच्या क्रेटा कारमधून काही कामासाठी जात होते. ते गावाबाहेरच्या रस्त्यावर आले असतानाच लाल रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने प्रमोद कुमार यादव यांना नेताजी म्हणत गाडी थांबवायला हाक मारली.

अज्ञात व्यक्तीला पाहून प्रमोद यादव यांना कारमधूनच माहिती घ्यायची होती. त्यावर तरुणाने लग्नपत्रिका तुम्हाला द्यावी लागेल, असं सांगितलं. नेताजींनी गाडी थांबवून खिडकी खाली केली आणि दुचाकीस्वार तरुण अगदी जवळ आले. नेताजींना काही समजण्यापूर्वीच तरुणांनी आपली बंदूक काढत अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या

हल्लेखोरांनी प्रमोद यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये उजव्या बाजूला छातीपासून कंबरेपर्यंत चार गोळ्या लागल्या आहेत, तर एक गोळी नितंबावर आणि एक गोळी मानेवर लागली आहे.

चोरटे दुचाकी सोडून पळून गेले

प्रमोद यादव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर चोरटे घटनास्थळीच दुचाकी सोडून पळून गेले.

माहिती मिळताच भाजप नेते रुग्णालयात पोहोचले

या घटनेनंतर लोकांनी तातडीने प्रमोद यादव यांना रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भाजपचे उमेदवार कृपाशंकर सिंह आणि पुष्पराज सिंह आणि इतर भाजप नेते घटनास्थळी पोहोचले.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

प्रमोद यादव यांच्या हत्येची बातमी कळताच पोलीस विभागात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक त्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रत्येक पैलू तपासण्यात व्यस्त आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.