Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ.

शासकीय डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ.

छत्रपती संभाजीनगर: शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नग्न अवस्थेत डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. नशेत असतांना त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.


संबंधित व्हिडिओ पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा असल्याचा दावा केला जात आहे. एक शासकीय डॉक्टर पुर्णपणे नग्न अवस्थेत रुग्णालय परिसरात फिरत होता. संबंधित डॉक्टराचे नग्न अवस्थेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. अंगावरील कपडे काढून डॉक्टर रुग्णालयाच्या परिसरात फिरत होता. ही सर्व घटना रुग्णालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, रुग्णालयातून कुणीतरी हा व्हिडीओ लीक केला आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बिडकीन शासकीय रुग्णालय चर्चेत आहे. या रुग्णालयात डॉक्टरांकडून वेळेवर उपचार मिळत नसल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. सोबतच डॉक्टर वेळेवर येत नाही अशाही तक्रारी आहे. याच रुग्णालयातील एका डॉक्टराचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.