Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्र विशेष पोलीस सुरक्षा मिळावी : आमदार सुधीरदादा गाडगीळ

श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्र विशेष पोलीस सुरक्षा मिळावी : आमदार सुधीरदादा गाडगीळ


सांगली १ मार्च २०२४:- सांगलीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी हे अखंड महाराष्ट्र छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री संभाजी महाराज तसेच हिंदू धर्माची जागृती व प्रचारानिमित्त महाराष्ट्र भर दौरे करत असतात. दिनांक २९ फेब्रुवारी रोजी मनमाड येथे दौर्यानिमित्त गेले असता त्यावेळी त्यांच्या गाडीचा ताफा अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. असे यापूर्वी हे वारंवार हल्ले त्यांच्यावर झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाकडून आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांना संपूर्ण महाराष्ट्रभर विशेष पोलीस सुरक्षा मिळावी. अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री  तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.