Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शंभर फुटी रस्ता पूर्ण रुंदीचा करावा विद्युत खांब काढावेत अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको: मनोज भिसे

शंभर फुटी रस्ता पूर्ण रुंदीचा करावा विद्युत खांब काढावेत अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको: मनोज भिसे 

शंभर फुटी रस्ता पूर्ण रुंदीचा करावा विद्युत खांब काढावेत अन्यथा लोकहित मंचच्या वतीने रास्ता रोको व रस्त्याच्या निकृष्ट  दर्जाच्या कामाबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करणार  -- लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे
                 
सांगलीतील महत्त्वाचा ठरणाऱ्या शंभर फुटी रस्त्याचं काम सध्या महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने सुरू आहे मात्र हे काम, *"असून घोटाळा नसून खोळंबा*"अशा तऱ्हेचे होताना दिसत आहे .कारण सदर रस्ता हा 100 फुटी असतानाही केले जाणारे काम हे केवळ 60 फूटच केले जात आहे.अगोदरच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे वाढलेली असताना महापालिका प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे .शिवाय या रस्त्यावरील विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत.त्यामुळे हा रस्ता करूनही नागरिकांना तो किती फूट वापरता येणार याकडेही महापालिका प्रशासनाने डोळे उघडून पहायची गरज आहे.या रस्त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या डोळ्यात आणि रस्त्यावरही केवळ धूळ फेक करण्याचे काम महानगरपालिकेकडून चालू आहे .

केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून 15 कोटी 40 लाख त्यामुळे निधीचा केवळ माती करण्याचेच काम महापालिकेकडून चालू आहे . निधी आहे म्हणून तो कसाही खर्च करता कामा नये .हे काम सुरू करण्याआधी या ठिकाणची अतिक्रमणे, झाडे,आणि विद्युत खांब हटवणे गरजेचे होते.शिवाय केले जाणारे काम हे निकृष्ट दर्जाचे केले जात असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्याचा व येत्या दोन दिवसात यात सुधारणा न झाल्यास ,लोकहित मंचच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावर रास्ता रोको करून काम बंद पाडू असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे .


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.