Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुपर स्टार अजित कुमार यांनी रस्त्याकडेला बनवली बिर्याणी

सुपर स्टार अजित कुमार यांनी रस्त्याकडेला बनवली बिर्याणी 

कलाविश्वातील प्रत्येक कलाकार त्याच्या अभिनयासह लक्झरी लाइफस्टाइलमुळे चर्चेत येत असतो. यात बरेच कलाकार महागड्या रेस्टॉरंटमध्ये लंच किंवा डिनर करतांनाही दिसून येतात. मात्र, यांच्यामध्येही काही कलाकार अपवाद आहेत.

कलाविश्वात असे काही कलाकार आहेत जे त्यांचा स्टारडम बाजूला ठेवून कायम सर्वसामान्यांमध्ये मिसळून एकत्र राहणं पसंत करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याने चक्क त्याच्या मित्रपरिवारासाठी रस्त्याच्या कडेला बिर्याणी तयार केली.


सोशल मीडियावर सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार  याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तामिळ अभिनेत्याने रस्त्याच्या कडेला उभं राहून चक्क त्याच्या टीमसाठी बिर्याणी तयार केली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. अजितने सध्या त्याच्या बिझी शेड्युलमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सध्या तो त्याच्या मित्रांसोबत बाइकने रोड ट्रीपसाठी रवाना झाला आहे. या रोड ट्रीपमध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर अजितने सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली.


दरम्यान, अजितचे बिर्याणी करतानाचे काही फोटो क्रिटिक आणि ट्रेंड अनालिस्ट रमेश बाला यांनी X (ट्विटर) वर शेअर केले आहेत. अजित २०२३ मध्ये थुनिवू या सिनेमात झळखला होता. त्यानंतर लवकरच तो Vidaa Muyarchi या सिनेमात झळकणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.