Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुचाकी देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण, तरुणाला अटक

दुचाकी देण्यास नकार दिल्याने बेदम मारहाण, तरुणाला अटक

दुचाकी देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला शिवीगाळ करुन लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार हडपसर परिसरातील गौरी पटेल गल्लीत सोमवारी (दि.26) रात्री नऊच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी  आरोपीला अटक केली आहे. याबाबत जितेंद्रकुमार कालीचरण कोरी (विय-22 रा. लोहिया नगर, सोसायटी, मगरपट्टा रोड, हडपसर) याने बुधवारी (दि.28) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सौम्या उर्फ समर्थ रविंद्र तिपे (वय-19 रा. भोरी पडळ गल्ली, हडपसर) याच्यावर आयपीसी 326, 323, 504, 427 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी त्याच्या मित्रासोबत गौरी पाटील गल्लीत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा आरोपी सौम्या त्याठिकाणी आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे दुचाकी मागितली. मात्र, दुचाकीत पेट्रोल नसल्याने तसेच गाडी खराब असल्याचे सांगत फिर्यादी यांनी दुचाकी देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. त्यावेळी जितेंद्रकुमार त्याला अडवण्यासाठी गेला असता आरोपीने बांबूने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा हात फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.