Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आरोपीला नेत असताना पोलिसांना मारहाण

आरोपीला नेत असताना  पोलिसांना मारहाण

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ओळख पटलेल्या एका अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यास आलेल्या भाईंदर पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना भाईंदरच्या गणेश देवलनगर झोपडपट्टीत एकाने ठोशा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे.

भाईंदर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई सुशीलकुमार पवार (३४) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे १६ ते १७ वर्षांचा दुचाकी चोरी करणारा संशयित युवक दिसून आला.

पोलिस गणेश देवलनगरमधील गल्ली क्र. २ मध्ये तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते. त्याला ताब्यात घेत असताना त्या ठिकाणी अयोध्या मिश्रीलाल गुप्ता (मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश) हा आला. त्याने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. पोलिसांची कॉलर धरली. त्यांना धक्काबुक्की करत चापट्या मारत व बुक्क्यांनी मारहाण केली. शिपाई सलमान पटवे हे पुढे आले असता त्यांनादेखील पोटात बुक्के मारून ढकलून दिले. पोलिसांना अर्वाच्च शिव्या देत अरेरावी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.