Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसबीएसपीच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर यांची हत्या

एसबीएसपीच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर यांची हत्या

सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव नंदिनी राजभर (वय ३०) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घरात त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना धमकी मिळत होत्या असं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच एएसपी, सीओ यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. डिघा गावात राहणाऱ्या नंदिनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) च्या महिला शाखेच्या प्रदेश महासचिव होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी त्या जिल्हा स्टेडियममध्ये आरएसएसकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्या घराकडे रवाना झाल्या होत्या.

नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चार वाजता त्या जेव्हा घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना दरवाजा उघडा आढलला. त्यानंतर आरती देवींनी नंदिनी यांना आवाज दिला, पण त्यांना उत्तर मिळालं नाही. घरात दुसरं कोणी नव्हतं. एका खोलीत त्यांना नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं आढळल्या. त्यानंतर आरदी देवींनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.