Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टोल भरुन प्रवास करता ना? हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत

टोल भरुन प्रवास करता ना? हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत


हायवेवरून प्रवास करताना टोल द्यावा लागतो. त्यामुळे खिशावर चांगलाच ताण येतो. चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरणं भाग आहे असं सांगितलं जातं. आपण तो भरतोही. अनेकदा त्या बदल्यात खरोखरच चांगले रस्ते मिळतात का हा चर्चेचा विषय असू शकतो; पण टोल भरल्यानंतर तुम्हाला हायवेवरून प्रवास करताना इतरही काही सुविधा मिळू शकतात हे तुम्ही जाणता का?

गाडी बंद पडली, पेट्रोल किंवा डिझेल संपलं किंवा मेडिकल इमर्जन्सी आली तर तुम्हाला मदत करणं हे त्या हायवेचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचं कर्तव्य आहे. सर्व टोल नाक्यांवर अँब्युलन्स, रिकव्हरी व्हेइकल आणि सिक्युरिटी टीम्स तैनात ठेवल्या जातात. रस्त्यात कुठल्याही वाहनचालकाला एखाद्या इमर्जन्सीला सामोरं जावं लागलं असता एका फोनवर ही वाहनं पाठवली जातात. त्यासाठी एनएचएआयकडून काही हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तुम्ही नियमितपणे नॅशनल हायवेवरून प्रवास करत असाल तर हे नंबर तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवणं आवश्यक आहे. त्याची गरज पडू नये; मात्र वेळ कधी सांगून येत नाही. त्यामुळे दुर्दैवाने वेळ आलीच तर हेल्पलाइन नंबर हाताशी असलेले बरे.

टोल लागू असलेल्या हायवेवरून प्रवास करताना तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आणि आसपास पेट्रोल पंप नसेल तर गाडी बाजूला घेऊन तुम्ही टोल रिसीटवर देण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबरला किंवा 8577051000 या नंबरला फोन करा. त्यानंतर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पेट्रोल किंवा डिझेल पोहोचवण्याची सोय केली जाईल. पेट्रोल किंवा डिझेलची किंमत तुम्हाला द्यावी लागते; पण त्याव्यतिरिक्त कुठलाही एक्स्ट्रा चार्ज तुमच्याकडून आकारला जात नाही.

टोल हायवेवरून प्रवास करताना गाडी बंद पडली तर मेकॅनिक किंवा फ्री क्रेन सर्विस मिळणं हा तुमचा हक्क आहे. कारण तुम्ही टोलचे पैसे मोजताय. 8577051000, 7237999955 या नंबरवर फोन करून तुम्ही अशी मदत मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे पैसे मागितले जात असतील तर हे नियम तुम्ही त्यांना सांगू शकता. अशी वेळ न येवो, पण प्रवासात कोणी आजारी पडलं तर वैद्यकीय मदत मिळणं हा तुमचा हक्क आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अँब्युलन्स तुम्ही बोलवू शकता. 8577051000 किंवा 7237999911 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मोफत अँब्युलन्स मिळवू शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.