Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वायनाडमधून राहुल गांधी विरोधात 'हा ' नेता लढणार! भाजपने उमेदवारी केली जाहीर

वायनाडमधून राहुल गांधी विरोधात 'हा '  नेता लढणार! भाजपने उमेदवारी केली जाहीर 

भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. देशातील इतर राज्यांसह, पक्षाने केरळमधील वायनाड मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली आहे. जिथून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत. वायनाडमधून भाजपने आपले विश्वासू के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने या यादीत 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यात नवीन जिंदाल आणि अभिनेत्री कंगना यांचा देखील समावेश आहे.भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगनाला तिकीट दिले आहे. काँग्रेसचे सदस्यत्व सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नवीन जिंदाल यांनाही पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

कोण आहेत के सुरेंद्रन कोण ?

सुरेंद्रन हे अनुभवी राजकारणी आहेत. सध्या ते केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी झामोरिनच्या गुरुवायूरप्पन कॉलेज, कोझिकोडमधून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद  मधून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.  त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी उत्तर मलबार जिल्हा सहकारी विपणन संस्थेचे संचालक, दिसा सेवा संस्कार केंद्राचे अध्यक्ष, राष्ट्रीय युवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाचे संस्थापक आणि सल्लागार मंडळावर काम केले. त्यांनी नेहरू युवा केंद्रचे सदस्य अशा विविध पदांवर काम केले.

भाजपकडून महाराष्ट्रात या 3 जागांसाठी उमेदवार जाहीर यानुसार सोलापुरातून भाजपने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.