सांगली आरटीओतर्फे एप्रिल ते जून दरम्यान तालुकानिहाय शिबीरउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांची माहिती
सांगली : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मार्फत नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ही शिबिरे होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.
इस्लामपूर येथे १ आणि १५ एप्रिल, ६ आणि ३० मे, ३ आणि १८ जूनरोजी शिबिरे होणार आहेत, विटा येथे २, १२, २२, ३० एप्रिल, १३, २१, ३१ मे तसेच ४, १३, २१ आणि २८ जून रोजी शिबीर घेण्यात येणार आहे. कडेगाव येथे १८ एप्रिल, २ आणि १५ मे, ११ जून रोजी शिबिर होईल.पलूस येथे १६ एप्रिल, ३, २२ मे, १२ जून रोजी शिबिर होणार आहे. आष्टा येथे ४, १९, २९ एप्रिल, १०, २७ मे, ६, १४, २७ जून रोजी शिबिर होणार आहे. आटपाडी येथे १०, २६ एप्रिल, १७ मे, ७ आणि २६ जून रोजी शिबिर होईल. जत येथे ५, २३ एप्रिल, ९, २८ मे, १० आणि २४ जून रोजी शिबिर होणार आहे. शिराळा येथे ३ एप्रिल, १४, २९ मे, १९ जून रोजी शिबिर होईल. तासगावमध्ये ८, २५ एप्रिल, ८, १६ मे, ५, २० जूनला शिबिर होणार आहे. कवठेमहांकाळ येथे २४ एप्रिल, ३० मे, २५ जून रोजी शिबिर होईल. या शिबिरांचा वाहनधारकांनी लाभ घेण्याचे आवाहन आरटीओ सगरे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.