Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'४०० फूट खाली जमिनीत गाडू'! इंडिया आघाडीतील नेत्याचं पंतप्रधान मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य

'४०० फूट खाली जमिनीत गाडू'! इंडिया आघाडीतील नेत्याचं पंतप्रधान मोदींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य

देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. त्यातच आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

या वक्तव्यानंतर भाजपने इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोपही केला आहे. दरम्यान आपण पंतप्रधानांविरोधात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसूनआपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नजरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नजरुल इस्लाम-

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येते म्हणतात की, नरेंद्र मोदी हुकूमशहा होत आहेत. त्यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. मोदींना राज्यघटना बदलायची आहे. आम्ही ४०० पार जाऊ, अशी घोषणा त्यांनी दिलीली आहे. मात्र मीतुम्हाला सांगतो, ४०० जागा नाही, तर नरेंद्र मोदीला ४०० फूट आत गाडले जाईल. यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. मात्र, हिंदुस्तान टाईम्स मराठी या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

दरम्यान भाजपचे झारखंडमधील प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी इंडिया आघाडीवर आरोप केले की, त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. नजरुल इस्लाम यांचे वक्तव्य व्हायरल होऊन २४ तास उलटूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे या वक्तव्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचे दिसते.

यापूर्वी, कोडरमा येथे एका आरजेडी नेत्यानेही मोदींसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनाक्रमावरून स्पष्ट होते की, INDIA चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही तरी मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत आहेत.

भाजपचीनिवडणूक आयोगाकडे तक्रार -

'झामुमो' च्या केंद्रीय समिती सदस्याच्या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपने नजरुल इस्लाम यांच्या अटकेची मागणी केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.