Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'ही' सुंदर रशियन तरुणी शोधतीये भारतीय नवरदेव; प्रोफाईलसाठी दिला QR कोड

'ही' सुंदर रशियन तरुणी शोधतीये भारतीय नवरदेव; प्रोफाईलसाठी दिला QR कोड

आजकाल लग्नाबाबत तरूणाईच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. मुलगा असो वा मुलगी आपला जोडीदार कसा हवा, याबाबत त्यांच्या प्रचंड अपेक्षा असतात. म्हणूनच आयुष्यभराचा जोडीदार शोधताना प्रत्येकजण आपल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. मात्र, आता एक रशियन तरुणी भलतीच चर्चेत आली आहे. जी रस्त्यावर फिरत आपल्यासाठी भारतीय नवरदेव शोधत आहे.

या रशियन तरूणीने अनेक व्हीडीओ पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती फक्त भारतीय नवरा शोधत असल्याचे तिच्या व्हीडीओ वरून स्पष्ट होते. नवरदेव शोधण्याची तिची पद्धत मात्र अतिशय अजब आहे. ती चक्क एक क्यूआर कोड घेऊन फिरत आहे. हा क्यूआर कोड ती सार्वजनिक ठिकाणी चिकटवत आहे. कधी क्यूआर कोड असलेला टीशर्ट घालून फिरताना दिसत आहे. त्यामुळे तिचे सर्वच व्हीडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

डिजिटल युगात वाढत्या स्पर्धेमध्ये लोकांना स्वतःसाठी योग्य जोडीदार कसा आणि कुठे शोधायचा हे जाणून घेणे आता कठीण झाले आहे. यासाठी डेटिंग ॲप्सचा वापर केला जातो. असं असूनही लोकांना योग्य ती जुळवाजुळव होत नसल्याचं अनेकदा दिसून येतं. त्यामुळेच या रशियन तरूणीने जोडीदाराच्या शोधासाठी शादी.कॉम सारख्या अॅपला फूली मारत इन्स्टाग्रामवर नवरा भारतीय नवरा मिळेल का हे पाहण्यास सुरवात केली आहे.

इन्स्टाग्रामवर dijidol नावाच्या अकाऊंटवरून हे सर्व व्हीडीओ शेअर करण्यात आले आहेत. जे या मुलीचं स्वतःचे अकाऊंट आहे. तसही भारतीय तरूणांन रशियन्स मुलीचं खूप आकर्षण असतंच त्यामुळे आयती चालून आलेली ही संधी वाया जाऊ देऊ नका!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.