Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्क्रू ड्राइव्हर छातीत, पोटात खुपसून वडीलांचा निर्घृण खून :, मुलाला अटक

स्क्रू ड्राइव्हर छातीत, पोटात खुपसून वडीलांचा निर्घृण खून :, मुलाला अटक 

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून कर्जबाजारी झालेल्या मुलाने चक्क बापाची हत्त्या केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील सातारा भागात घडला. वडील पैसे देत नसल्यामुळे मुलाने झोपेतच गळा दाबून त्यांचा खून वडिलांनी प्रतिकार करताच स्क्रू ड्रायव्हर त्यांच्या छाती आणि पोटात खोलवर खुपसून निर्घृण खून केला. ही घटना आज (दि. १६) सकाळी ७ वाजता उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
श्रीकृष्ण वामनराव पाटील (वय ६२, रा. डिलक्स पार्क, दीपनगर, चाटे स्कूलजवळ, सातारा परिसर) असे मृताचे नाव आहे. त्यांची मुलगी गौरी (वय 18) हिच्या तक्रारीवरून मुलगा रोहित श्रीकृष्ण पाटील (वय ३०) याच्याविरुद्ध वडिलांच्या खुनाचा, आई आणि बहिणीला मारहाण करून प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. 

मृत श्रीकृष्ण पाटील हे महावितरणमध्ये आॅपरेटर म्हणून नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे सिल्लोड येथेही घर आहे. परिवार सातारा परिसरात राहात असल्याने तेही येथेच राहायचे. त्यांच्या एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी शिकत आहे. मुलाचे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग झालेले आहे. तो शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून टक्केवारीने नफा देण्याचा व्यवसाय करायचा. मात्र, यात त्याला प्रचंड तोटा आला. अनेकांकडून घेतलेले पैसे गुंतविल्यावर तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याने वडिलांकडे पैसे मागितले होते. मात्र, घरात लग्नाला आलेली मुलगी आहे. आता तुला पैसे देऊन काय करू, असे म्हणून त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे रोहितने कट रचून वडिलांचा खून केला.

 आई-बहिणीचाही गळा दाबला

रोहितनेच वडिलांना मारल्याचा प्रकार त्याच्या आई आणि बहिणीने पाहिला. हे त्याच्या लक्षात येताच त्याने त्यांचाही गळा दाबून दोघींनाही संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी जोरात विरोध केला. त्याचवेळी बहीण त्याच्या तावडीतून सुटली आणि बाहेर पळाली. त्यावर त्याने बहिणीला विनंती करून आत बाेलावून घेत खून दुसऱ्यांनी केल्याचा बनाव रचला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.