Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोदींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी..:, हायकोर्टात याचिका दाखल, वाचा नेमके प्रकरण काय?

मोदींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी..:, हायकोर्टात याचिका दाखल, वाचा नेमके प्रकरण काय?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली जावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उच्च न्यायालयातील एका वकिलानेच ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी प्रचारात सातत्याने देवाचा आणि मंदिरांचा उल्लेख करत त्या आधारावर मते मागत आहेत.


असे करून ते निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. आनंद जोंधळे नामक वकिलाने ही याचिका दाखल केली आहे.  याचिकेत पंतप्रधानांनी ९ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पीलीभित येथील सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. मोदी यांनी भाषणात हिंदू देवी- देवता आणि प्रार्थनास्थळांसोबतच शीख धर्माच्या प्रार्थनस्थळांचा उल्लेख करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

या कारणास्तव त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली जावी. आपण राम मंदिराची निर्मिती केली, कर्तारपूर साहिब कॉरिडॉरचा विकास केल्याचे मोदी यांनी कथितपणे या सभांमध्ये सांगितले.  गुरूद्वारांमध्ये लंगरमध्ये जी सामग्री दिली जाते त्याचे जीएसटीही आपण समाप्त केल्याचे ते म्हणाले. अफगाणिस्तानातील गुरू ग्रंथसाहिबच्या प्रती आपण परत मागवल्या आहेत असेही त्यांनी म्हटल्याचा दाखला देत याचिकाकर्त्याचे असे म्हणणे आहे.

की पंतप्रधानांनी केवळ हिंदू देवी देवतांच्या नावावर मते मागितली नाहीत तर त्यांनी शीखांच्या गुरूंच्या नावावरही मते मागितली आणि इतर राजकीय पक्ष मुस्लिमांची बाजू घेत असल्याची टिप्पणीही केली. हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन आहे व त्यामुळे पंतप्रधानांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.