संघर्ष कुणाला चुकलाय? रिक्षा चालकाची फाटलेल्या कॉलरवर पुन्हा शिलाई घातली गेली आहे तुमचेही डोळे पाणावतील
एखादा सण, वाढदिवस असेल किंवा घरातील कार्यक्रम आपण सगळेच नवीन कपडे विकत घेतो. कपाट कपड्याने भरलेलं असले तरीही तर मॉलमध्ये आकर्षक सवलत असेल तर नवनवीन गोष्टी खरेदी करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.
तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विनाकारण कपडे खरेदी करण्याच्या मुद्द्याला अनुसरून काही खास गोष्टी सांगितल्या आहेत ; ज्या तुम्हाला देखील नक्कीच विचार करायला भाग पाडतील.
व्हायरल व्हिडीओत एक महिला रिक्षातून प्रवास करत असते. एक वृद्ध व्यक्ती ही ऑटोरिक्षा चालवताना दिसत आहे. प्रवास करताना तिचे लक्ष रिक्षाचालकाकडे जाते. महिला रिक्षा चालकांच्या गणवेशाकडे पाहते तेव्हा त्यांच्या फाटलेल्या कॉलरवर पुन्हा शिलाई घातली गेली आहे असे तिला दिसून येते. कुर्ता अनेक वेळा फाटला असावा हे या शिलाईवरून दिसून येते आहे. तर ही गोष्ट पाहून महिलेने रिक्षा चालकाची परवानगी घेऊन व्हिडीओ शेअर करत एक हृदयस्पर्शी संदेश लिहिते. एकदा पाहाच ही पोस्ट.तुम्ही पाहिलं असेल की, तरुणीने लिहिलं आहे, 'सध्याची वेगवान फॅशन स्वस्त दिसत असली तरीही त्याचे खूप तोटे आहेत. स्वतःचे कपडे टाकून देण्याएवजी गरिबांना मदत करण्यासाठी त्यांना दान करा किंवा तुम्ही त्याचा पुन्हा वापर करा. आपण जुन्या कपड्यांना फेकून न देता पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. कारण - कुठेतरी अनेकांना हे स्टायलिश कपडे घालायलाही मिळतही नाहीत. म्हणून फॅशनेबल कपडे पुन्हा घालण्यास लाजू नका. कारण जुने कपडे पुन्हा घालणे वाईट नाही, तर स्टायलिश आहे' ; असा संदेश तिने कॅप्शनसह दिला आहे.
व्हायरल व्हिडीओ महिलेच्या @miss_jugadu या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच महिलेनं वृद्ध रिक्षा चालकांना पैशांची मदत करण्याच्या प्रयत्न देखील केला. पण, रिक्षा चालकाने नकार दिला. तसेच वृद्ध रिक्षा चालक दूध विक्रेता म्हणून देखील काम करतात. वृद्ध रिक्षा चालकाची परवानगी घेऊन तिने हा सोशल मीडियावर पोस्ट केला आहे ; जो सध्या अनेकांना विचार करायला भाग पाडत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.