Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दही खाताना अजिबात करू नका 'या' चुका

दही खाताना अजिबात करू नका 'या' चुका

उन्हाळ्यात दह्याचं भरपूर सेवन केलं जातं. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये याचा समावेश होतो. बरेच लोक साधं दही खाणंही पसंत करतात. दह्यामध्ये व्हिटॅमिन, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसहीत अनेक पोषक तत्व असतात. पण दही खाताना काही गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. दही खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. नाही तर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. दह्यासोबत कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे आज तेच जाणून घेऊ...

दही खाल्ल्यावर काय खाऊ नये

आंबा आणि दही

फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा तसा तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पण आंबा दह्यासोबत खाणं टाळलं पाहिजे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन, खनिज आणि फायबर असतं. पण आंबा दह्यासोबत खाल्ल्याने थंड-उष्ण याच असंतुलन होऊ शकतं आणि यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधी समस्या होऊ शकते. शरीरात टॉक्सिन वाढू शकतं. तसेच पचनासंबंधी काही समस्याही होऊ शकतात. त्यामुळे आंबा दह्यासोबत खाणं टाळलं पाहिजे.

दही आणि दूध

दही आणि दूधाचं सेवन सोबत करू नये. याने पचनासंबंधी समस्या वाढू शकते. दही खाल्ल्यानेवर लगेच दूध प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते. जुलाबही लागू शकतात. तसेच पोट फुगणे आणि गॅसचीही समस्या होऊ शकते. त्याशिवाय दही सहजपणे पचन होतं आणि दूध पचायला वेळ लागतो. त्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं.

उडीद डाळ आणि दही

उडीद डाळ आणि दही सोबत खाणंही टाळलं पाहिजे. उडीद डाळ आणि दह्याचं सोबत सेवन केल्याने किंवा दही खाल्ल्यावर लगेच ही डाळ खाल्ल्याने डायजेशनसंबंधी समस्या वाढू शकतात. अपचन, ब्लोटिंग, डायरिया आणि पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात.

कांदा आणि दही

अनेकदा जेवण करताना कांद्याचा सलाद आणि दही सोबत खाल्लं जातं. पण दही आणि कांदा सोबत खाल्ल्याने स्किन एलर्जी होऊ शकते. कारण कांदा आणि दह्याचे गुण वेगवेगळे असतात. त्याशिवाय पोटासंबंधी समस्या होऊ नये यासाठीही कांदा आणि दह्याचं सोबत सेवन करणं टाळलं पाहिजे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.