Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह KG ची वयो मर्यादा ठरली

ब्रेकिंग न्यूज! आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह KG ची वयो मर्यादा ठरली 


शिक्षण हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आजकाल शिक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त झाले असून स्पर्धेच्या जीवनात टिकण्यासाठी पालकवर्ग आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी अत्यंत सजग दिसून येतो. या मध्ये बऱ्याचदा आपली पाल्ये लवकरच शाळेत घातली जातात. नर्सरी असेल किंवा केजी असेल किंवा पहिलीतील प्रवेश असेल पालक आपल्या पाल्यास शाळेत घालण्याची घाई करतात. परंतु आता शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

लहान वयातच विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडू नये, यासाठी केंद्र सरकारने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे कधीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहेत हे निश्चित केले आहे. त्यामुळे आता सरकारी शाळा असो की खासगी सहा वर्षे पूर्ण होत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

यासाठी विद्यार्थ्यांचे वय कधीपर्यंत सहा वर्षे पूर्ण असावे याबाबत देखील माहिती मिळाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सहा वर्षे पूर्ण होणारी बालके यंदा इयत्ता पहिलीत दाखल करून घेता येणार आहेत. ज्या बालकांची सहा वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनाच सक्ती पात्र तथा दाखल पात्र समजण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 'आरटीई'नुसार अशा बालके शाळेत दाखल करून घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल असेही सांगण्यात आले आहे.

अहमदनगरमधील पहिलीच्या शाळा व विद्यार्थी किती?

जिल्ह्यात एकूण झेडपी शाळा ३ हजार ५४५ असून यात अंदाजे प्रवेशित विद्यार्थी ९० हजार इतके असणार आहेत. यात 'आरटीई'तील शाळा ४ हजार ५४ इतक्या असतील.

असे असेल प्रवेशाचे वय

नर्सरीसाठी १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ – ३ वर्षे

ज्युनिअर केजीसाठी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० – ४ वर्षे

सिनिअर केजीसाठी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ -५ वर्षे

इयत्ता पहिलीसाठी १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ – ६ वर्षे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.