Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुनेवर संशय घेणाऱ्या सासूचं डर्टी सेक्रेट :, DNA चाचणीत कळाल असं काही.

सुनेवर संशय घेणाऱ्या सासूचं डर्टी सेक्रेट :, DNA चाचणीत कळाल असं काही.


नातेसंबंध हे एखाद्या नाजूक धाग्याप्रमाणे असतात. प्रेमाने, विश्वासाने ते जसे बळकट होतात तसेच संशयाने, वादविवादाने ते कमकुवत देखील होतात. सासू - सुनेचे नाते तर अत्यंत नाजूक. सासू व सून या धाग्याची दोन टोकं, दोन्ही बाजू जेवढ्या समजूतदार तेवढाच नात्यावरील ताण कमी. मात्र दोन्ही बाजूने जेव्हा ओढलं जातं तेव्हा धागा तुटतो. एकदा का धागा तुटला की तो पूर्वीसारखा जोडला जात नाही, गाठ येतेच. असचं एक उदाहरण सोशल मीडियाद्वारे समोर आले आहे.

एका महिलेला मुलगी होते. मुलीच्या डोळ्यांचा रंग हिरवा असल्याने सासूच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. हे आपत्य आपल्या मुलाचे नाहीच असा त्या महिलेच्या सासूचा समज होतो. हा समज एवढा वाढतो की, उठता बसता सासू सुनेला टोमणे मारू लागते. एवढंच काय तर घरातील इतर सदस्यांचेही कान भरते. ते देखील महिलेला टोमणे मारू लागतात.

महिलेच्या नवऱ्याला तिच्यावर पूर्ण विश्वास असतो. मात्र आपण निष्कलंक असल्याचे सिद्ध करण्यासाठी ती महिलाच डीएनए चाचणी करण्यासाठी पुढे सरसावते. डीएनए चाचणीचा निकाल मात्र सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकावणारा ठरतो. महिलेला झालेल्या मुलीचे डोळे हिरवे असले तरी ती पतीपासूनच झाली असल्याचा निर्वाळा डीएनए चाचणीद्वारे होतो. मात्र चाचणीद्वारे महिलेच्या पतीच्या जन्माबाबतचं एक गूढ उलगडतं. महिलेचे सासरे हे महिलेच्या पतीचे वडील नसल्याचा धक्कादायक निकाल डीएनए चाचणीद्वारे समोर येतो. 

यामुळे, सासूच्या जाचाला कंटाळून मुलीच्या जन्माचे कोडे सोडवायला निघालेल्या या पती-पत्नीसमोर आता महिलेच्या पतीचे वडील कोण? असा नवा प्रश्न उभा राहिला आहे. डीएनए चाचणीतून समोर आलेला हा धक्कादायक निकाल दोघांनीही अद्याप कुटुंबियांना कळवला नाही. मात्र आपले खरे वडील कोण? हे जाणून घेण्याची पतीची इच्छा असल्याचे पत्नीने रेडीट या समाज माध्यमावर सांगितले आहे.

सासूने संशयीवृत्ती दाखवत सुनेच्या चारित्र्यावर बोट उचलले, मात्र स्वतःवर असलेला डाग ती विसरली. डीएनए चाचणीच्या माध्यमातून तिने इतक्या वर्षांपासून गुपित ठेवलेलं हे रहस्य आता मुलासमोर आलं आहे. हे सत्य समोर आल्यानंतर आपला पती आईला जाब विचारण्यासाठी उतावीळ झाला असून आपणच त्याला रोखत असल्याचे महिलेने म्हंटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.